मित्रानो माझ्या खुश कसे राहायचे या लेखामध्ये आपले स्वागत आहे.
जीवन जगताना खुश कसे रहायचे यावर आपण आज
या लेखामधे पाहुया. खरतर मित्रानो खुश राहण्याकरिता
पहिले तर तुम्ही समाधानी असायला पाहिजे, तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये समाधानी नसाल तर तुम्ही खुश
राहण्यापासून वंचित राहाल.
तुम्ही जे काही करता आहे त्यामधे तुम्हाला आवड आणि समाधान असायला हवे. तुम्ही जे करता आहे त्याची तुलना
तुम्ही कुणासोबत करायला नको, जसे की त्याला इतका पगार आहे, त्याला सरकारी नोकरी आहे, त्याची खूप मालमत्ता आहे, त्याच्याकडे ही गाडी आहे , त्याचे घर खूप मोठे आहे या प्रकारच्या तुलना तुम्ही जर इतरांसोबत केल्या तर तुम्ही खुश नाही राहू शकणार.
खुश राहण्यासाठी आत्मविश्वास पण खूप महत्वाचा आहे.
तुम्ही जर एखादी गोष्ट करण्याचे ठरविले तर ती पूर्ण करण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तो तुमच्याकडे असायला हवा ज्यामुळे तुम्ही जे काही करण्याचे ठरविले आहे ते पूर्णत्वास उतरेल आणि मग तुम्ही ते काम आपण करू शकलो किंवा ते काम आपण पूर्ण केले म्हणून आनंदी होणार म्हणजेच खुश होणार.
आनंदी किंवा खुश राहण्यासाठी तुम्ही चिंतामुक्त असायला पाहिजे , तुम्ही जीवन जगताना येणाऱ्या खूप लहान लहान
अडचणींची चिंता न करता त्या अडचींना ठामपणे सामोरे
जयाले हवे. तुम्ही छोट्या छोट्या अडचणींची चिंता न करता त्यावर न घाबरता यशस्वीपणे मात करायला पाहिजे.
आनंदी किंवा खुश राहण्यासाठी तुमचे मन पण स्थिर असायला हवे म्हणजेच तुम्ही जर एखादा निर्णय घेतला
तर तोच निर्णय तुम्ही पूर्णत्वास न्यायला हवा. तुम्ही जर सारखे निर्णय बदलेत तर तुमचे मन स्थिर राहणार नाही
आणि तो घेतलेला निर्णय पूर्णत्वास गेला नाही तर तुम्ही निराश होणार म्हणजेच तुम्ही आनंदी किंवा खुश राहू नाही शकणार.
आनंदी किंवा खुश राहण्यासाठी तुमचे इतरांसोबत बोलणे आणि वागणे हे पण महत्वाची भूमिका बजावतात.
जरा तुम्ही इतरांसोबत चांगले बोलले आणि चांगले वागले
तर ते पण तुमच्याशी चांगले वागणार आणि बोलणार,
पण कधी कधी परिस्थिती उलटी पण होते अशा वेळेस आपण शांत राहून त्या परिस्थितीला सामोरे जाऊन ती चांगल्या रीतीने सोडविण्याचा प्रयत्न करावा.
तुम्हाला कुणाचे बोलणे किंवा वागणे पटले नसेल तर
त्यावर विचार करत बसू नका ते तिथेच सोडून तुम्ही तुमचा जीवनाचा प्रवास सुरू ठेवा त्यावर झुरत बसू नका.
चांगला आहार आणि योग्य व्यायाम व अध्यात्म हे पण जीवनामधे आनंदी राहण्यासाठी गरजेचे आहे.
योग्य आहार आणि योग्य व्यायाम हे आपल्या शरीराला
निरोगी ठेवण्यास मदत करते.
चांगली पुस्तके, चांगली संगत, भजन आणि कीर्तन ह्या
गोष्टी पण आपणास आनंदी आणि खुश राहण्याकरिता
मदत करतात.
तर मित्रानो माझा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर
नक्की तो इतरांना शेअर करा आणि यावर तुमच्या कॉमेंट्स द्या.